
रेव्हेन्यू अँड रजिस्ट्रेशन डिपार्टमेंटस् गर्व्हंमेंट सर्व्हंटस् को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड अहिल्यानगर
स्थापना: १ ऑगस्ट १९२१
रजि. नं. ३५७२
सभासद सस्नेह ऋणपूर्ती योजना
-
संस्थेच्या मयत सभासदांच्या वारसांना व जामीनदारांना आर्थिक दिलासा मिळावा म्हणून सभासद सस्नेह ऋणपूर्ती योजना तयार केलेली आहे.
-
या योजनेसाठी सभासदाचे वर्गणी खातेमधून दरवर्षी जुलै महिन्यात रूपये ३००० /- वर्ग करणेत येत होते, परंतु चालू वर्षामध्ये सभासदांच्या वर्गणीमधून ही रक्कम वर्ग केलेली नाही. यासाठी संस्थेने ढोबळ नफ्यातून दरवर्षी १०% प्रमाणे तरतूद करावयाचा उपविधी केला आहे. ही तरतूदीची रक्कम सभासद सस्नेह क्रणपुर्ती फंडामध्ये जमा केली जाणार आहे.
-
सदरचे फंडातूनमयत सभासदांचे वारसांना मदत दिली जाणार आहे. त्याप्रमाणे उपविधी दुरूस्ती होणेसाठी दि. २१/०९/२०२४ रोजीचे वार्षिक सर्वसाधारण सभेत मांडलेली आहे. सध्या या योजनेतून मयत सभासदांचे वारसांना प्रत्येकी रु. ६,००,०००/- ची मदत दिली जाते.
-
सभासदाकडे कर्ज येणे असेल तर कर्जाची रक्कम वजा जाता जी रक्कम शिल्लक असेल ती त्यांचे कायदेशीर वारसास अदा केली जाईल.
-
जर एखादा सभासद परागंदा झाला असेल व परागंदा होवून ७ वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधी झाला असेल व अशा सभासदाचे वारसाने याबाबत संस्थेस सकारण सिध्द करुन दिल्यास अशा सभासदांचा वैधानीक मृत्यू झाला आहे असे समजून या योजनेखाली अशा सभासदाचे वारसास लाभ देता येईल.
-
परंतू असा सभासद परागंदा झाला त्यावेळी तो थकबाकीदार कर्जदार असेल व त्यांचे जामीनदारांनी कर्जफेड केली असेल त्यावेळी कर्जफेड करणाऱ्या जामीनदारांना त्यांनी फेडलेली कर्ज रक्कम या योजनेतून प्राप्त होणाऱ्या रकमेच्या प्रमाणात अदा केली जाईल.
-
त्याचप्रमाणे मयत थकबाकी कर्जदार सभासदाचे त्यांचे जामिनदारांनी कर्जफेड केली असेल त्यावेळी कर्जफेड करणाऱ्या जामीनदारांना त्यांनी फेडलेली कर्ज रक्कम या योजनेतून प्राप्त होणाऱ्या रकमेच्या प्रमाणात अदा केली जाईल.
या आर्थिक वर्षामध्ये सदरचे फंडातून मयत कर्जदार सभासदाचे वारसाना खालीलप्रमाणे लाभ देण्यात आलेला आहे.

-
या योजनेसाठी सन २०२२-२३ वर्षापासून सभासदाचे वर्गणी खातेमधून दरवर्षी जुलै महिन्यात रूपये ३००० /- वर्ग करणेत येणार आहेत.
सन २०२२-२०२३ या आर्थिक वर्षामध्ये सदरचे फंडातून मयत कर्जदार सभासदाचे वारसाना खालीलप्रमाणे लाभ देण्यात आलेला आहे.
