
रेव्हेन्यू अँड रजिस्ट्रेशन डिपार्टमेंटस् गर्व्हंमेंट सर्व्हंटस् को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड अहिल्यानगर
स्थापना: १ ऑगस्ट १९२१
रजि. नं. ३५७२
कर्ज मर्यादा वाढ परिपत्रक
संस्थेच्या सर्व सभासदांना या परिपत्रकाद्वारे विदीत करणेत येते की, महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था नियामक मंडळाच्या दि.१२.०९.२०२५ च्या निर्णया प्रमाणे संस्थेच्या कार्यकारी मंडळाने सभासदांच्या वाढीव गरजांचा विचार करुन खालीलप्रमाणे कर्जाची मर्यादा वाढविली आहे. त्या प्रमाणे संस्थेने उपविधी क्र. फ -१.१० अ यामध्ये खालीलप्रमाणे बदल केलेला आहे.
उपविधी क्र. फ -१.१० अ :-
ज्या सभासदांची नोकरी किमान सलग १ वर्षे पूर्ण किंवा त्या पेक्षा जास्त सेवा झालेली असेल अशा सभासदास खालील तक्त्या प्रमाणे कर्ज मिळेल.
वरील तक्त्या प्रमाणे कर्ज अदा करताना पेमेंट ऑफ वेजेस ऍक्ट मधील तरतुदी नुसार त्या कर्मचाऱ्याच्या सर्व प्रकारच्या शासकीय कपातीसह देण्यात येणाऱ्या कर्जाची वसुली ही एकुण वेतनाच्या ७५% पेक्षा जास्त होणार नाही एवढया मर्यादे पर्यतच कर्ज मंजुर करता येईल. प्रत्येक वेळी त्यास मिळणाऱ्या निव्वळ रक्कमेच्या १०% शेअर्स घ्यावे लागतील. शेअर्स धारण करण्याची मर्यादा संपलेली असेल तर, पुढील रक्कम ही संचित ठेव म्हणुन घेतली जाईल. कर्ज संपलेनंतर ही रक्कम परत केली जाईल. सदर ठेवीवर कर्जाच्या व्याज दरा पेक्षा १% कमी दराने व्याज अदा केले जाईल. सर्व सभासदांनी वरील योजनांचा लाभ घ्यावा ही विनंती.
