top of page

सभासद सस्नेह ऋणपूर्ती योजना 

  • संस्थेच्या मयत सभासदांच्या वारसांना व जामीनदारांना आर्थिक दिलासा मिळावा म्हणून सभासद सस्नेह ऋणपूर्ती योजना तयार केलेली आहे. 

​

  • या योजनेसाठी सभासदाचे वर्गणी खातेमधून दरवर्षी जुलै महिन्यात रूपये ३००० /- वर्ग करणेत येत होते, परंतु चालू वर्षामध्ये सभासदांच्या वर्गणीमधून ही रक्‍कम वर्ग केलेली नाही. यासाठी संस्थेने ढोबळ नफ्यातून दरवर्षी १०% प्रमाणे तरतूद करावयाचा उपविधी केला आहे. ही तरतूदीची रक्कम सभासद सस्नेह क्रणपुर्ती फंडामध्ये जमा केली जाणार आहे.

​

  • सदरचे फंडातूनमयत सभासदांचे वारसांना मदत दिली जाणार आहे. त्याप्रमाणे उपविधी दुरूस्ती होणेसाठी दि. २७/०७/२०२५  रोजीचे वार्षिक सर्वसाधारण सभेत मांडलेली आहे. सध्या या योजनेतून मयत सभासदांचे वारसांना प्रत्येकी रु. ७,००,०००/- ची मदत दिली जाते.

​

  • दि. ३१/०३/२०२६ रोजी या फंडात रक्कम रू. २०,३९,९७०/- जमा आहेत. दि. ०१/१२/२०२५ पासून मयत झालेल्या सभासदांच्या वारसांना रू. ७,००,०००/- ची मदत दिलेली आहे. या आर्थिक वर्षामध्ये वारसांना एकूण रू. ५६,००,०००/- चा आर्थिक लाभ देणेत आलेला आहे.

​​

  • सन २०२४-२०२५ वर्षामध्ये सदरचे फंडातूनमयत सभासदांचे वारसांना मदत दिली होती.
    त्याप्रमाणे उपविधी दुरूस्ती होणेसाठी दि. २१/०९/२०२४ रोजीचे वार्षिक सर्वसाधारण सभेत मांडलेली होती. या योजनेतून मयत सभासदांचे वारसांना प्रत्येकी रु.
    ६,००,०००/- ची मदत दिली जात होती.
    ​

​

  • सभासदाकडे कर्ज येणे असेल तर कर्जाची रक्‍कम वजा जाता जी रक्‍कम शिल्लक असेल ती त्यांचे कायदेशीर वारसास अदा केली जाईल.
     

  • जर एखादा सभासद परागंदा झाला असेल व परागंदा होवून ७ वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधी झाला असेल व अशा सभासदाचे वारसाने याबाबत संस्थेस सकारण सिध्द करुन दिल्यास अशा सभासदांचा वैधानीक मृत्यू झाला आहे असे समजून या योजनेखाली अशा सभासदाचे वारसास लाभ देता येईल.

​

  • परंतू असा सभासद परागंदा झाला त्यावेळी तो थकबाकीदार कर्जदार असेल व त्यांचे जामीनदारांनी कर्जफेड केली असेल त्यावेळी कर्जफेड करणाऱ्या जामीनदारांना त्यांनी फेडलेली कर्ज रक्‍कम या योजनेतून प्राप्त होणाऱ्या रकमेच्या प्रमाणात अदा केली जाईल.

​

  • त्याचप्रमाणे मयत थकबाकी कर्जदार सभासदाचे त्यांचे जामिनदारांनी कर्जफेड केली असेल त्यावेळी कर्जफेड करणाऱ्या जामीनदारांना त्यांनी फेडलेली कर्ज रक्‍कम या योजनेतून प्राप्त होणाऱ्या रकमेच्या प्रमाणात अदा केली जाईल.

​​

​​​

     

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

      सन २०२४-२०२५ वर्षामध्ये सदरचे फंडातून मयत कर्जदार सभासदाचे वारसाना  खालीलप्रमाणे

      लाभ देण्यात  आलेला आहे.

​

     

​

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

      सन २०२३-२०२४ वर्षामध्ये सदरचे फंडातून मयत कर्जदार सभासदाचे वारसाना  खालीलप्रमाणे

      लाभ देण्यात  आलेला आहे.

image.png
image.png
image.png

​​

  • या योजनेसाठी सन २०२२-२३ वर्षापासून सभासदाचे वर्गणी खातेमधून दरवर्षी जुलै महिन्यात रूपये ३००० /- वर्ग करणेत येणार आहेत.

​

​
     सन २०२२-२०२३ या आर्थिक वर्षामध्ये सदरचे फंडातून मयत कर्जदार सभासदाचे वारसाना                       खालीलप्रमाणे लाभ देण्यात आलेला आहे.

image.png

संपर्क साधा: 'रेव्हेन्यू कॉम्प्लेक्स' बुरूडगल्ली, बंगाल चौकी जवळ, अहिल्यानगर. फोन: (०२४१) २३४४८३३ ई-मेल:  revenuesociety@yahoo.in

©2026. Powered By Dhimahi Dynamics Tech

bottom of page