
रेव्हेन्यू अँड रजिस्ट्रेशन डिपार्टमेंटस् गर्व्हंमेंट सर्व्हंटस् को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड अहिल्यानगर
स्थापना: १ ऑगस्ट १९२१
रजि. नं. ३५७२
भरती परिपत्रक
या परिपत्रकाद्वारे कळविणेत येते कि, दि. ३१/०१/२०२६ रोजी सेवक भरती प्रक्रियेतील उमेदवार यांची संख्या
कमी असलेने सेवा भरती प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यामुळे उमेदवारांना पुरेशी संधी देण्यासाठी संचालक मंडळाच्या दि. ३१/०१/२०२६ रोजी झालेल्या निर्णयानुसार दि. ०२/०२/२०२६ ते दि. १०/०२/२०२६ दुपारी २:०० वाजेपर्यंत अर्ज मागणी करण्याचा निर्णय घेतला असल्याने उमेदवारांनी खालील पदांसाठी संस्थेच्या कार्यालयात (संस्थेची सुट्टी वगळून ) दि. १०/०२/२०२६ रोजी दुपारी २:०० वाजेपर्यंत सादर करावेत.
सदरची भरती नियम क्र. १ इ नुसार करणेत येत आहे.
नियम व अटी -
१) वाणिज्य पदवीधारक/जी.डी.सी. अण्ड ए./इतर संस्था किवा बँकेतील अनुभव असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.
२) संस्थेत दिलेली नेमणुक पुर्णतः तात्पुरत्या स्वरुपाची राहिल.
३) या परिपत्रकासोबत अर्जाचा नमुना जोडला आहे. तसेच संस्थेचे कार्यालय व www.revenue-society.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
४) संस्थेचे सेवानियम संस्थेत पहावयास मिळतील.
५) अर्ज छाननी नंतर पुढील प्रक्रिया संस्थेच्या कार्यालयात प्रसिध्द केली जाईल.
६) सदर भरती प्रक्रियेत बदल करण्याचे/पुढे ढकलण्याचे / रद्द करण्याचे अंतिम अधिकार कर्मचारी मंडळाचे राहतील.
