top of page

सेवक भरती परिपत्रक 

या परिपत्रकाद्वारे सर्व सभासदांना कळविणेत येते की, संस्थेस क्लार्क कर्मचारी भरती करावयाची आहे. संस्थेच्या सेवानियम क्रमांक १ इ नुसार सभासदांच्या पाल्यांना प्रथम प्राधान्य देणेचा निर्णय संचालक भंडळाने घेतला आहे. ज्या सभासदांची मुले/मुली संस्थेच्या सेवा नियमातील तरतुदी नुसार पात्र आहेत अशा उमेदवारांची संस्थेच्या कार्यालयात(संस्थेची सुट्टी वगळून) दिनांक ०५/०५/२०२५ रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत समक्ष अर्ज आणून द्यावेत. मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.       

 

 

 

नियम व अटी - 


१) वाणिज्य पदवीधारक/जी.डी.सी. अण्ड ए./इतर संस्था किवा बँकेतील अनुभव असणाऱ्या उमेदवारास
प्राधान्य दिले जाईल.

२) सदर भरती फक्त संस्थेच्या सभासदाच्या मुले/मुली यांचेसाठीच आहे.

 

३) दि. ३१/१२/२०२४ रोजी जे संस्थेचे सभासद आहेत त्यांची मुले/मुली यांनीच अर्ज करावेत.

४) संस्थेच्या सेवेत नेमणुक झाल्यानंतर २ वर्ष प्रोबेशनरी पिरियड राहील. सदर कालावधीमध्ये मुळ
पगाराइतकेच अथवा रुपये १५.०००/- पेक्षा जास्त नसेल इतकेच वेतन दिले जाईल. ही मुदत संपल्यानंतर नेमणूक केलेल्या सेवकाची वागणूक व काम समाधानकारक असल्यास व संस्थेत शेड्यूलमध्ये जागा शिल्लक असल्यास त्यास वेतन श्रेणी लागू करण्यात येईल.

 

परंतू त्याचे प्रोबेशनरी मुदतीत काम व वागणूक असमाधानकारक वाटल्यास त्यास सेवेतून कमी केले जाईल. 

५) या परिपत्रकासोबत अर्जाचा नमुना जोडला आहे.


    तसेच संस्थेचे कार्यालय व www.revenue-society.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

६) संस्थेचे सेवानियम संस्थेत पहावयास मिळतील.

७) अर्ज सादर करतेवेळी अर्जासोबत रु. १०००/ -भरती शुल्क भरणे आवश्यक आहेत.

८) अर्ज छाननी नंतर पुढील प्रक्रिया संस्थेच्या कार्यालयात व वेबसाईटवर प्रसिध्द केली जाईल.

 

९) अजदाराचे वय अर्ज करताना दि.०१/०१/२०२५ रोजी १८ वर्षापेक्षा कमी व २८ पेक्षा जास्त असणार नाही.

१०) सदर भरती प्रक्रियेत बदल करण्याचे/पुढे ढकलण्याचे / रद्द करण्याचे अंतिम अधिकार कर्मचारी मंडळाचे राहतील.

image.png

संपर्क साधा: 'रेव्हेन्यू कॉम्प्लेक्स' बुरूडगल्ली, बंगाल चौकी जवळ, अहिल्यानगर. फोन: (०२४१) २३४४८३३ ई-मेल:  revenuesociety@yahoo.in

©2025. Powered By Dhimahi Dynamics Tech

bottom of page