
रेव्हेन्यू अँड रजिस्ट्रेशन डिपार्टमेंटस् गर्व्हंमेंट सर्व्हंटस् को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड अहिल्यानगर
स्थापना: १ ऑगस्ट १९२१
रजि. नं. ३५७२
वार्षिक पारितोषिक योजना परिपत्रक
संस्थेच्या सर्व सभासदांना या परिपत्रकाद्वारे विदीत करणेत येते की, दरवर्षीप्रमाणे शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये यश संपादन केलेल्या सभासदांचे मुलां/मुलींना पारितोषिके द्यावयाची आहेत. हि पारितोषिके “ सन २०२२-२३ ” या वर्षामध्ये खालील परीक्षा उत्तीर्ण झालेल्या मुलां-मुलींना देणेत येतील.
१) इयत्ता ४ थी २) इयत्ता ५ वी (स्कॉलरशिप )
३) इयत्ता ७ वी ४) इयत्ता ८ वी (स्कॉलरशिप )
५) इयत्ता १० वी ६) इयत्ता १२ वी (सर्व विभाग )
७) प्रत्येक विभागाची पदवी परीक्षा
८) प्रत्येक विभागाची द्विपदवी परीक्षा
९) सर्व खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमात प्राविण्य मिळविलेले असल्यास.
ज्या सभासदांची अविवाहीत मुले/मुली निर्दीष्ट परीक्षा “ सन २०२२-२३ ” वर्षामध्ये उत्तीर्ण झालेली असतील त्यांनी गुणपत्रिकेच्या प्रमाणित सत्यप्रतीसह संस्थेकडे सोबत. जोडलेल्या नमुन्याप्रमाणे अर्ज करावे. वरील प्रत्येक परीक्षेसाठी मागासवगीया करीता एक पारितोषिक राखीव ठेवलेले आहे. राखीव पारितोषिकासांठी मागासवर्गीय असल्याचा सक्षम अधिकाऱ्यांचा दाखला अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. सदर अर्ज संस्थेकडे दि. ०५/०७/२०२४ अखेर जमा करणेत यावेत. कळावे.
THOR-37946: New-Web-UI-Add-3-Actions-to-Domestic-Enrolment-Screen